एम्परर इमॅन्युएल चर्च, ज्याला सियोन असेही म्हणतात, हे केरळची सांस्कृतिक राजधानी असलेल्या त्रिशूर जिल्ह्यातील मुरियाड पंचायत येथे स्थित एक ख्रिस्ती उपासनेचे केंद्र आहे. सियोनचे ध्येय म्हणजे देवाचा पुत्र येशू ख्रिस्त यांच्या दुसऱ्या आगमनाची शुभवार्ता प्रचारणे आणि देवाच्या लोकांना त्यासाठी तयार करणे.
केरळच्या विविध भागांतून, इतर राज्यांतून तसेच जगाच्या विविध देशांतून लोक सुवार्ता ऐकण्यासाठी सियोनमध्ये येतात. सियोन ही भविष्यवाणी आणि प्रेरितांच्या सेवांची उत्तराधिकारी व्यवस्था असून, ती इतर कोणत्याही ख्रिस्ती चर्च किंवा प्रणालीच्या अधिकाराखाली नाही.
याला “एम्परर इमॅन्युएल”असे नाव का दिले आहे?
देवाचा पुत्र आपल्या पुनरागमनाच्या वेळी जे नवीन नाव धारण करेल ते इमॅन्युएल असेल. (यशया ७:१४)
येशू ख्रिस्त यांचे दुसरे आगमन पापांसाठी प्रायश्चित्त करण्यासाठी नसून, राजांचा राजा म्हणून प्रकट होण्यासाठी आहे. इंग्रजी भाषेत राजांचा राजा याला सम्राट (Emperor) म्हणतात. त्यामुळे जो इमॅन्युएल सम्राट आहे, तोच सम्राट इमॅन्युएल आहे. (इब्री ९:२८, प्रकटीकरण १९:१६)
म्हणजेच, तो सम्राट इमॅन्युएल या नावाने पुन्हा आला आहे. थोडक्यात सांगायचे तर, देवाच्या पुत्राच्या पुनरागमनासाठी त्याचे स्वागत करण्यासाठी आणि त्याच्यासाठी एक लोकसमूह तयार करण्यासाठी ही सियोन प्रणाली स्थापित करण्यात आली आहे, आणि म्हणूनच तिला “एम्परर इमॅन्युएल चर्च” असे नाव देण्यात आले आहे.
एम्परर इमॅन्युएल चर्चला “चर्च ऑफ लाइट”का म्हटले जाते?
१९९० साली मेक्सिको येथे परिशुद्ध माता प्रकट झाली तेव्हा त्यांनी सांगितले की, “देवाच्या पुत्राच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी “चर्च ऑफ लाइट” अचानक उदयास येईल, आणि ती त्याच्यासाठी जगभर तयार केली जाईल. प्रभूपिता या चर्च समुदयाला “चर्च ऑफ लाइट” असे संबोधतो, कारण ते इमॅन्युएलवर विश्वास ठेवतात आणि त्याचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. इमॅन्युएल हा प्रकाश आहे आणि तो देहधारण करून पुन्हा आला आहे, असा त्यांचा विश्वास आहे.
याला “सियोन”असे का म्हणतात?
प्राचीन इस्राएलमध्ये यहुदी राजा दावीद याचा राजवाडा व किल्ला ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणाचे नाव सियोन होते. म्हणजेच, दावीदाने जिंकलेला किल्ला म्हणजे सियोन. दोन हजार वर्षांपूर्वी येशू ख्रिस्त यांचा जन्म दावीदाच्या वंशात झाला.
प्रभूपित्याचे वचन सांगते:
“कारण प्रभूपित्याने सियोनची निवड केली आपल्या निवासासाठी त्याला ती आवडली आहे.” (स्तोत्र १३२:१३)
परंतु दोन हजार वर्षांपूर्वी तो सियोन नावाच्या निवासस्थानी राहिला नाही. तो गोठ्यात जन्मला आणि कलवारीवर मरण पावला.
परंतु त्याच्या दुसऱ्या आगमनाच्या वेळी, “तो सियोनाकडे आणि याकोबापैकी जे अधर्मापासून परावृत्त झाले त्यांच्याकडे उद्धारकर्ता म्हणून येईल” (यशया ५९:२०)
म्हणून, भविष्यवाणीतील लेखनानुसार देवपुत्राचे दुसरे आगमन सियोनकडे, म्हणजेच दावीदाच्या घराण्याकडे आहे. देवाने केरळमधील मुरियाड येथे आपल्या पुत्राच्या दुसऱ्या आगमनासाठी निवासस्थान म्हणून ही दैवी व्यवस्था तयार केली आहे. म्हणूनच या व्यवस्थेला सियोन असे म्हटले जाते.
कारण प्रभूपित्याने सियोनची निवड केली आहे; त्याने ते आपले निवासस्थान म्हणून इच्छिले आहे. हेच माझे सदैवचे विश्रांतीस्थान आहे; इथेच मी वास करीन, कारण मी याची इच्छा केली आहे.
स्तोत्र १३२:१३–१४
English
Malayalam
Fill out the form and we will get back to you as soon as possible
© 2026. Church of Light Emperor Emmanuel Zion. All rights reserved.