सियोन हा तो कळप आहे ज्याला प्रभू पित्याने जगाच्या सृष्टीपूर्वी निवडले आहे. त्या कळपाच्या रूपात जो प्रभू पित्याच्या पुत्राच्या समानतेच्या अनुरूप होण्यासाठी नियत आहे.
विश्वास आणि सियोन
सियोन हा
जगाच्या निर्मितीपूर्वी प्रभु देवाने निवडलेला कळप आहे, तो कळप जो प्रभु देवाच्या पुत्राच्या
प्रतिरूपात तयार होण्यासाठी निश्चित केला आहे.
सियोन हा
जगाच्या निर्मितीपूर्वी प्रभु देवाने निवडलेला कळप आहे (रोमकरांस पत्र ८:३०).
तो कळप जो प्रभु देवाच्या पुत्राच्या प्रतिरूपात तयार होण्यासाठी निश्चित केला आहे.
(इफिसकरांस पत्र १:४; रोमकरांस पत्र ८:२९), सियोन प्रभू पित्याच्या सर्व
लिखित वचनांना आमेन म्हणतो.
सियोन एका
काळावधीत (युगात) राहतो ज्याला आज म्हटल जात. (इब्री लोकांस ३:१३). काळाच्या चिन्हांवरून
(मत्तय २४:३२-३४) आपल्याला कळते की हे शेवटचे दिवस आहेत. सियोनला प्रभु
पित्याद्वारे कान दिले आहेत. प्रभु पित्याच्या
राज्याची सुवार्ता त्या लोकांना दिली जाते ज्यांच्याकडे कान आहेत (मार्क ४:९;
लूक ८:८; प्रकटीकरण २:७, प्रकटीकरण ३:६, प्रकटीकरण १३:९). कान हे दैवीक ज्ञान
आहे. हे कान जगाच्या आवाजापासून प्रभु देवाचा आवाज ओळखण्याची देणगी देतात. कारण सियोनला
प्रभु देवाचा आवाज ओळखण्याची क्षमता आणि त्याच्या आवाजावर विश्वास ठेवण्यासाठी एक नवीन
हृदय दिले गेले आहे (यहेज्केल ३६:२६), म्हणून इम्मानुएल ला चर्चमधून
बाहेर काढले गेले आहे , जिथे नियम सर्वोच्च आहेत (योहान १०:४). या कळपाला
परिपूर्ण होण्यासाठी बोलावण्यात आले आहे (इब्री लोकांस ११:३९-४०), त्याआधी
कि सर्व कुलपित्यांना ज्यांना प्रभु पित्याद्वारे नीतिमान बनवले आहे त्यांनी परिपूर्णता
प्राप्त करावी. आता सियोनचा कळप प्रभू देवाचा अनुभव घेण्यासाठी अरण्यांत पोहोचला आहे.
दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर, सियोन आता दुसऱ्या निर्गमनात आहे. सियोन, ज्याला इतर
सर्व लोकांपेक्षा अधिक सुंदर वारशाचे वचन देण्यात आले आहे (यिर्मया ३:१९),
इतर सर्व लोकांपेक्षा जास्त विश्वास ठेवतो.
सियोनचा विश्वास काय आहे?
सियोन विश्वास
करतो आणि सुवार्तेची घोषणा करतो की देवाचा पुत्र आणि एकमेव तारणहार येशू ख्रिस्त पुन्हा
देहधारणासह जगात आला आहे (१ योहान ४:२, यिर्मया १४:८-९). त्याचे नाव
इम्मानुएल आहे (यशया ७:१४) आणि तो जगाचा न्याय करेल आणि प्रभु पित्याची
नीति (धोरण) पूर्ण करेल (यशया ४२:२-४). फक्त एक व्यक्ति, ज्याच्याकडे
प्रभु पित्याचा आत्मा आहे तोच असा दावा करू शकतो की येशू ख्रिस्त पुन्हा देहधारणासह
आला आहे (१ योहान ४:२). २००० वर्षांपूर्वी जेव्हा येशू ख्रिस्त या जगात
आला तेव्हा तो देहधारणासह आला नाही, तर देवाच्या वचनाच्या आत्म्याच्या रूपात आला (लूक
१:२८). परिशुद्ध आईच्या विश्वासाने, त्याने तिच्या गर्भात देहधारण केला (योहान
१:१४; रोमकरांस पत्र ३:२६). पण आता तो दुसऱ्यांदा देहधारण करून आला आहे (१
योहान ४:२). सियोनचा असा विश्वास आहे की त्याने जगाच्या निर्मितीपूर्वी प्रभू पित्याने
त्याला दिलेल्या सर्व प्रभूच्या मुलांना एकत्र करून त्याच्या प्रकाशाच्या सभेची स्थापना
केली आहे (१ थेस्सलनीकाकरांस ५:५) (इफिसकरांस १:४; योहान ६:३९),
जे त्याचे स्वतःचे भाऊ आहेत (इब्री २:११) त्याच्या आत्म्याद्वारे (जखऱ्या
१०:८-१०; यहेज्केल ३६:२४-२७). सियोन असा विश्वास व्यक्त करतो की इम्मानुएल
तारणारा (मुक्तीदाता) बनून (स्वतःला प्रकट करेल), प्रभूच्या राज्याचा राजांचा राजा
सियोनला येईल (यशया ५२:८; यशया ५९:२०; इब्री ९:२८). सियोन कबूल करतो
की जे त्याच्यावर आणि त्याच्या जीवन देणाऱ्या वचनावर (योहान ६:६३) विश्वास
ठेवून मरण पावले त्यांचे पुनरुत्थान होईल आणि ते स्वर्गीय शरीरासह सियोनला येतील (१
थेस्सलनीकाकरांस ४:१६). सियोनचे अवशेष लोक असीम (अपरिमित) प्रेम, कृपा आणि सामर्थ्याने
भरलेले असतील आणि त्यांच्या प्रतिरूपात रूपांतरित होतील (१ थेस्सलनीकाकरांस ४:१७;
फिलिप्पैकरांस ३:२०-२१; १ करिंथकरांस १५:५२). सियोन कुटुंबाचा असा विश्वास
आहे की प्रभु पिता त्याच्या मुलांना भेटायला येईल (आमोस ४:१२, १ योहान ३:२).
सियोनला आशा आणि विश्वास आहे की सियोन कळप प्रभु पित्याला त्याच्या स्वतःच्या नग्न
डोळ्यांनी पाहिल जसे ते खरोखर आहेत आणि जेव्हा ते आपल्या मुलांना भेटायला येतील तेव्हा
ते लोक त्यांच्यासारखे होतील (१ योहान ३:२-३; १ करिंथकरांस १३:१२). सियोनचा
असा विश्वास आहे की इम्मानुएल सर्व नियम, शक्ती आणि अधिकार रद्द करेल आणि राज्य प्रभु
पित्याला सोपवेल (१ करिंथकरांस १५:२४). सियोनचा दावा आहे की इम्मानुएल
आपल्याला स्वत:बरोबर आपल्या खऱ्या घरी, स्वर्गीय सियोन (स्तोत्रसंहिता ८७:५;
फिलिप्पैकरांस ३:२०; योहान १४:३), स्वर्गीय नगरामध्ये घेऊन जाईल ज्याची आपण
वाट पाहत आहोत (इब्री लोकांस ११:१०, इब्री लोकांस १३:१४, प्रकटीकरण २२:१९),
ज्या घरांना त्याने आपल्यासाठी तयार केले आहे (योहान १४:२). सियोन असाही
विश्वास करतो की ही पृथ्वी आणि देवाच्या वचनाने निर्माण केलेले आणि टिकवलेले सर्व काही
जेव्हा देवाचे वचन त्यांच्याकडून काढून घेतले जाईल तेव्हा पूर्णपणे नष्ट होईल (२
पेत्र ३:१०).
सियोनचा असा
दृढ विश्वास आहे की परिशुद्ध आई ही परिशुद्ध ज्ञानाची जननी आहे (ज्ञान ६:१३;
ज्ञान ८:४; ज्ञान ९:९), आणि या ज्ञानाद्वारेच आपल्याला वचनाचा खरा अर्थ समजतो
आणि वचन नीतिमान आहे. सियोन कबूल करतो की परिशुद्ध मरीया ही सर्व मुक्तीदायक कार्यांमध्ये
पित्याची राजदूत आहे आणि सियोनमध्ये राहून आणि त्यांना एक मन बनवून , ती सियोनला दुसऱ्या
पेंटेकॉस्टसाठी तयार करेल (बारुख ३:३७). सियोन घोषित करतो की जो पर्यंत
कोणी परिशुद्ध मरीया, जी सर्वांची आई आहे, तिच्याकडे येत नाही तोपर्यंत आदमाच्या मुलांवरील ठेवलेला जड
जूं (जूआ) नष्ट होणार नाही (बेन सिरा ४०:१), आणि जो कोणी तिच्या जवळ
उभा राहील तो जीवन देणाऱ्या नियमाने भरला जाईल आणि अमर होईल (बारुख ४:१).
सियोन येशू
ख्रिस्ताबद्दल शास्त्रवचनांमध्ये लिहिलेल्या सर्व दैवीक रहस्यांवर आणि त्याच्या पहिल्या
आगमनात त्याने साध्य केलेल्या आणि त्याच्या दुसऱ्या आगमनात साध्य करणाऱ्या सर्व मुक्तीदायक कार्यांवर विश्वास ठेवतो. सियोन प्रभू देवाच्या
त्या सर्व वचनांवर विश्वास ठेवतो जे पूर्ण झाले आहेत, पूर्ण होत आहेत आणि पूर्ण होणार
आहेत. सियोन प्रभू देवाच्या सर्व कार्यांवर आणि त्या व्यक्तीवर विश्वास ठेवतो ज्याला
प्रभू देवाद्वारे पाठवला गेला आहे. काळाची सर्व चिन्हे, जी पित्याची साक्ष आहेत, ती
सियोनद्वारा स्वीकारली जातात (लूक २४:४४-४६). सियोनच्या कळपाचे हृदय
तेव्हा प्रज्वलित होते जेव्हा ते प्रभू देवाचे वचन ऐकतात. फक्त त्या लोकांचेच हृदय
जे विश्वास ठेवतात आणि उघडले जातात, त्यांचीच अंतःकरणे उत्साहाने प्रज्वलित होतात आणि
जेव्हा प्रभूच्या पुत्राने मन उघडले तेव्हाच प्रभूचे वचन समजू शकतात आणि त्यावर विश्वास
ठेवू शकतात (लूक २४:३२, लूक २४:४५). सियोनचा असा विश्वास आहे की प्रभू
देवाच्या वचनात सामर्थ्य आहे (मार्क १२:२४).
सियोन कबूल
करतो की देव पित्याने एदेन बागेत आपल्या मुलांना दिलेले सर्व राजत्व आणि गौरव पुनर्संचयित
केले जाईल (यिर्मया २९:११-१४). अंजिराच्या झाडाला फळ न दिल्याबद्दल शाप दिल्यानंतर,
येशू ख्रिस्त घोषित करतो की त्याचे शिष्य त्यांच्या विश्वासाद्वारे मोठी कामे करतील
(मत्तय २१:१८-२२). सियोनचा असा विश्वास आहे की गौरवाच्या या पुनर्स्थापनेद्वारे, देवाची मुले सर्व फळझाडांना
कायमचे फळ देऊ शकतात. सियोनचा असा विश्वास आहे की ज्या पर्वतावर ते राहतात, त्याला
हलवून समुद्रात ठेवण्याची आज्ञा दिली जाईल. सियोनचा असा विश्वास आहे की ही येशू ख्रिस्ताने
केलेली एक भविष्यवाणी होती. प्रभूच्या वचनाची शक्ती अनुभवणाऱ्या सियोन कळपासाठी, या
कार्यावर विश्वास ठेवणे काही कठिण नाही.
सियोनचा असा
विश्वास आहे की ज्याप्रमाणे हनोख (उत्पत्ति ५:२४) आणि एलीया (२
राजे २:११) यांना मृत्यूचा अनुभव न येता वर नेण्यात आले होते, त्याचप्रमाणे
सियोन कळप देखील मृत्यूचा अनुभव न घेता स्वर्गात नेण्यात येईल. मोशेच्या मृत्युनंतर
त्याचे शरीर वाहून नेणे हे प्रभूच्या मुलांच्या पुनरुत्थानाचे प्रतीकात्मक कृत्य होते
(यहूदा १:९). जेव्हा येशू ख्रिस्ताचे ताबोर पर्वतावर रूपांतर झाले तेव्हा
त्यांपैकी एकाला जिवंत असताना (एलीया) स्वर्गात वर नेण्यात आले होते आणि ज्याचे पुनरुत्थान
झाले त्याला (मोशे) खाली आणण्यात आले होते.
सियोन कबूल
करतो की सर्व सियोन कळप प्रभूच्या सामर्थ्याने याच विश्वासाद्वारे शेवटच्या काळात
- आज - प्रकट होण्यासाठी तयार केलेल्या तारणासाठी सुरक्षितपणे जतन केले जाईल (१ पेत्र
१:५). सियोनचा असा विश्वास आहे की या विश्वासाची परीक्षा होईल आणि या परीक्षांना तोंड
देणाऱ्या सियोन कळपाला इम्मानुएल ची स्तुती मिळेल, जो स्वतःला गौरवाने प्रकट करेल (१
पेत्र १:७).
म्हणून, सुवार्तेच्या
अपेक्षेने न डगमगता, सियोन विश्वासात स्थिर आणि दृढ राहतो (कलस्सैकर १:२३).
सियोन पंथ
स्वर्ग आणि
पृथ्वीच्या प्रभू, परिशुद्ध, माझ्या पित्यावर
मी विश्वास करतो. त्यांचा एकुलता एक पुत्र जो मानवपुत्रा सारखा ह्या पृथ्वीवर पुन्हा
देहधारण करून आला आहे राजांचा राजा आणि नाथांचा नाथ तारणहार इम्मानुएल वर मी विश्वास
करतो. सर्व कार्य आम्हाला शिकवणारे आणि त्याची आठवण करून देणारे सहाय्यक परिशुद्ध आत्म्यावर
मी विश्वास करतो. अविनाशी आणि उदात्त प्रेमाची,भक्तीची, ज्ञानाची आणि विशुद्ध प्रत्याशाची
आणि आपली आई परिशुद्ध कुमारी मरियेवर मी विश्वास करतो. येणारी कामे प्रकट करणाऱ्या
आणि आपल्याला सत्याच्या परिपूर्णतेकडे घेऊन जाणाऱ्या सत्याच्या आत्म्यावर मी विश्वास
करतो. मी परिशुद्ध ज्ञानाच्या आत्म्यावर विश्वास ठेवतो. पित्याच्या व्दारे पाठविलेल्या
कराराच्या दूतामध्ये, त्यांच्या व्दारे पूर्ण
केलेल्या नीतिच्या प्रवृत्तीमध्ये, नीतिच्या उत्थानावर मी विश्वास करतो. सत्य वचनावर, सत्य संदेष्ट्यांच्या आगमनावर आणि प्रकाशाच्या सभेवर
मी विश्वास ठेवतो. मी त्यांच्या पुत्राच्या आगमनात आपल्याला प्राप्त होणाऱ्या अपरिमित प्रेमावर, अपरिमित कृपेवर आणि अपरिमित शक्तीवर विश्वास ठेवतो. मी युगांच्या समाप्तीवर,
मृतकांच्या पुनरुत्थानावर,जिवीतांच्या रूपांतरणावर आणि नवीन आकाश आणि नवीन पृथ्वीवर
विश्वास ठेवतो जिथे नीतिमत्ता वास करते. मी पित्याने तयार केलेल्या अविनाशी नगरीवर
आणि पित्यासोबतच्या अनंतकाळच्या जीवनावर विश्वास ठेवतो. आमेन.
© 2026. Church of Light Emperor Emmanuel Zion. All rights reserved.